विमा सुविधा

  आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये आपल्या बँकेने केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ भारतीय जीवन विमा निगम (LIC) शी संलग्न असून त्याचा प्रिमीयम रु. ३३०/- आहे, प्रस्तुत योजनेचा विमा परतावा – रु. २. ०० लाख आहे. तसेच ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांचेशी संलग्न असून त्याचा प्रीमीयम रु. १२/- आहे, प्रस्तुत योजनेंतर्गत अपघाती विमा परतावा रु. २. ०० लाख आहे. या दोन्ही योजना आपल्या बँकेमध्ये कार्यान्वित झाल्या असून त्याच्या आपल्या सर्व सभासदांनी आणि खातेदारांनी लाभ घ्यावा. तसेच आपल्या बँकेने खातेदारांच्या रक्कम रु. १. ०० लाखांपर्यंत विमा संरक्षण असलेल्या डी. आय. सी. जी. सी. (डेपॉझिट इन्शुरन्स क्रेडीट गॅरेटी कॉर्पोरेशन ) ठेव विमा प्रेमियची रक्कम सहामाही पद्धतीने विहित वेळेत भरणा केलेला आहे.